My Mother Essay in Marathi|माझी आई निबंध

Mazi Aai Nibandh in Marathi

My Mother Essay in Marathi: मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये ” My Mother Essay in Marathi ” ह्या विषयावर निबंध पाहणार आहोत.

My Mother Essay in Marathi|माझी आई निबंध

माझी आई ! किती बरं वाटतं म्हणायला. कधी कुठे लागलं, खरचटल, अचानक धक्का बसला तोंडातून आपसूक निघणारा शब्द म्हणजे “आई”. आई सर्वांचीच जिव्हयाळ्याची व्यक्ती. तशीच माझी आई सुद्धा माझ्या खूप जिव्हाळ्याची. माझी आई एक अत्यंत निरागस आणि साधी स्त्री आहे. तिचे नाव सुजाता आहे.

मला आठवते त्याप्रमाणे लहानपणी चा बराचसा वेळ हा आई सोबतच व्यतीत झाला. पहिलं पाऊल कसं टाकायचा ते आत्ता पर्यन्त तिचे मोलाचे मार्गदर्शन आहे मला. म्हणूनच आई माझा पहिला गुरु , “आई माझा गुरु आई कल्पतरू , सौख्याचा सागरू आई माझी”. तिने लावलेल्या सवयी उदा: सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे , मोठ्याना नमस्कार करणे , संध्याकाळी दिवे लागणी नंतर शुभम करोती पठन करणे यांमुळे मला शिस्त लागली.

माझी परीक्षा म्हणजे तिची पण परीक्षा. अभ्यासासाठी तीही माझ्या सोबत जागते, मला चहा/ कॉफी करून देते. उजळणी मध्ये मदत करते. याचा तिच्या नियमित दिनचर्येवर वर काही फरक पडत नाही सगळी कामे अगदी रोजच्या वेळेत पूर्ण होतात याचे मला खूप आश्चर्य वाटते.

मी आजारी असले की ती खूप बेचैन होते. मला ताप आला तर रात्र रात्र भर माझ्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसते. स्वतःच्या दुखण्या कडे मात्र काना डोळा करते सगळ्या आया अशाच असतात वाटतं.

जशी ती माझी पहिली गुरु तशीच पहिली मैत्रीण सुद्धा आहे. तिच्याशी कोणत्याही विषयावर मी तासंतास बोलू शकते. आणि बोलते सुद्धा खरं तर हा आमचा आवडीचा छंद आहे. काय बरोबर काय चूक, कोणत्याही परिस्थिति मध्ये कसे वागावे हे मला ते नेहमी सांगत असते. तिच्या जीवन अनुभवातील उदाहरणे ही ती मला देते.

आई स्वयंपाक खूप छान बनवते. तिच्या हातचे सगळे पदार्थ मला खूप आवडतात. कधी कधी ती मला स्वयंपाक बनवायला ही शिकवते. आपली कामे आपण करावी हा तिचा अट्टहास असतो. याची मला स्वावलंबी तथा आत्मनिर्भर बनण्यात खूप मदत होते.

घरामद्धे कधी काही कठीण प्रसंग आला तर त्यातून बाहेर पडण्यासाठी ते अतोनात प्रयन्त्न करते. बाबांना तसेच आम्हा सर्वांना तिचा खूप आधार आहे. स्वतःच्या सुखाचा तसेच सोयीचा जास्त विचार न करता दुसर्‍यांना मदत माझी आईच करू शकते. तिच्या अशा सवयींमुळे सर्व लोक तिचा खूप आदर करतात. याचा मला फार अभिमान आहे.

भास्कर पाळंडेंची एक कविता आठवते

थोर तुझे उपकार
आई|

थोर तुझे उपकार|

वदत विनोदें हांसत सोडी
कोण दुधाची धार |

नीज न आली तर गीत म्हणे
प्रेम जिचें अनिवार |

येई दुखणे तेव्हां मजला
कोण करी उपचार |

कोण कड़ेवर घेउनि फिरवी
चित्ती लोभ अपार |


बाळक दुर्बळ होतों तेव्हां
रक्षण केले फार |

त्वांचि शिकविले वाढविले त्वां
आहे मजवर भार |

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें
होंते वारंवार|

नित्य करावे साह्य तुला मीं
हा माझा अधिकार
|

जसे ती प्रेम करते तसेच माझ काय चुकले तर मला चांगली खडसावते सुद्धा. तिच्या सर्व कृतींमागे माझ्या वरचे निस्सीमq प्रेम आहे. मला ही तिच्या वर खूप प्रेम आहे. तिने दिलेल्या आयुष्य बद्दल मी तिची ऋणी आहे. अशा माझ्या निरागस, प्रेमळ आईला चांगले आरोग्य, सुखं, समृधी लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

Aai Nibandh in Marathi | आई निबंध मराठी

कवि यशवंत म्हणतात ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी “. पाहायला गेले तर खूप तथ्य आहे या वाक्यात. जर आई नसली तर माणूस दिषाविरहित आयुष्य जगतो. आई या शब्दातच पूर्ण विश्व समावले आहे. या फक्त दोन अक्षरी शब्दात प्रचंड सामर्थ्य आहे. आई म्हणजे देवाचे दुसरे रूप, असे म्हणतात की देव स्वतः सर्वांजवळ जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठवले. आईच्या मायेपुढे जगातील इतर कोणतेही प्रेम फिके आहे. आईची महती सांगायला पूर्ण शब्द भंडार अपुरे आहे. तरी मी छोटासा प्रयत्न करतो.

म्हणतात बाळाबरोबर आईचा ही जन्म होतो . किती खरं आहे हे ! नऊ महीने ती बाळाला आपल्या पोटात सांभाळते. त्यावेळी किती बदलांना तिला सामोर्‍य जावे लागते. किती मानसिक आणि शारीरिक बादल तिच्यामध्ये होत असतात. त्या सर्व बदलांना ती हसत खेळत सहन करते.

जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा सगळे जग जणू तिच्यासाठी धूसर होते. ती स्वतःला विसरून जाते आणि बाळाच्या संगोपणात व्यस्त होते. जेव्हा बाळ झोपत नाही किंवा आजारी असते तेव्हा ती रात्र रात्र जागून त्याची सेवा करते. असा त्याग जगात कोणी ही कोणासाठी करू शकणार नाही. असा निःस्वार्थ त्याग करणे आपण तिच्याकडून शिकले पाहिजे.

“आई माझा गुरु आई कल्पतरू , सौख्याचा सागरू आई माझी” खरच आई सर्वांचा पहिला गुरु असते. अगदी पहिल्या पाऊलापासून ती आपल्याला मार्गदर्शन करत असते. जरी शेवट पर्यंत ती आपल्या सोबत नसली तरी तीची शिकवण नेहमी आपल्या सोबत असते. ती आपलायला चांगल्या सवयी लावते, चांगले संस्कार देते. शिस्तीमध्ये राहून आपले लक्ष्य कसे प्राप्त करायचे याचे शिकवण ती देते. तसेच ती आपणास स्वावलंबी राहण्यास शिकवते. याचा फायदा आपणास देंनंदिन जीवनात वावरण्यात होतो.

आपली परीक्षा असली की असा जाणवते की तीची पण परीक्षा चालू आहे. स्वतःची घरकामे चोख पार पाडून ती आपणास अभ्यासासाठी सकाळी लवकर उठवते, वेळेवर जेवायला देते, वेळ पडली तर आपल्यासोबत रात्री जागरण ही करते. आपण दुःखी असलो की तीही दुःखी होते.

जशी गुरु तशीच ती सर्वांची पहिली मित्रदेखील असते. आपला आनंद, दुःख, चिंता कुठलीही गोष्ट सर्वात पहिले आपण आईला सांगतो. आपल्या कोणत्याही अडचनिवर उपाय तिच्याकडे मिळतो. आपल्या यशावर सर्वात आनंदी आईच होते. जर आपल्याला अपयश आले तर ती आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते व आपल्याला हिम्मत देऊन परत प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करते.

तर आपण असे म्हणू शकतो की आई हेच आपले पहिले प्रेम. आई हीच आपली हक्काची सुरक्षित आणि मायाळू जागा. तीच आपलया इतके समर्थ बनवते की आपण जगातील कोणत्याही परिस्थिथिला सोयिस्कर रित्या तोंड देऊ शकतो. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सगळे गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई. अशा जगातील सर्व आईंस माझे नमन आणि खूप खूप प्रेम.

Majhi Aai Nibandh in Marathi 10 lines

  • कवि यशवंत म्हणतात ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी “.
  • आई म्हणजे देवाचे दुसरे रूप, असे म्हणतात की देव स्वतः सर्वांजवळ जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठवले.
  • “आई माझा गुरु आई कल्पतरू , सौख्याचा सागरू आई माझी” खरच आई सर्वांचा पहिला गुरु असते.
  • बाळाबरोबर आईचा ही जन्म होतो . किती खरं आहे हे ! नऊ महीने ती बाळाला आपल्या पोटात सांभाळते. त्यावेळी किती बदलांना तिला सामोर्‍य जावे लागते. किती मानसिक आणि शारीरिक बादल तिच्यामध्ये होत असतात. त्या सर्व बदलांना ती हसत खेळत सहन करते.
  • आपली परीक्षा असली की असा जाणवते की तीची पण परीक्षा चालू आहे.
  • स्वतःची घरकामे चोख पार पाडून ती आपणास अभ्यासासाठी सकाळी लवकर उठवते, वेळेवर जेवायला देते, वेळ पडली तर आपल्यासोबत रात्री जागरण ही करते.
  • जशी गुरु तशीच ती सर्वांची पहिली मित्रदेखील असते.
  • आपला आनंद, दुःख, चिंता कुठलीही गोष्ट सर्वात पहिले आपण आईला सांगतो.
  • आपल्या कोणत्याही अडचनिवर उपाय तिच्याकडे मिळतो.
  • आपल्या यशावर सर्वात आनंदी आईच होते.
  • आपण असे म्हणू शकतो की आई हेच आपले पहिले प्रेम. आई हीच आपली हक्काची सुरक्षित आणि मायाळू जागा.

Leave a Comment